मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) मुक्ताईनगर तालुक्यातील नायगांव येथे दि.२३ मे रोजी सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून योगराज कंट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे हे तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उद्योजक गौतम प्रधान असणार आहे. तर दिप प्रज्वलन माजी सभापती, समाज कल्याण- जयपाल बोदडे, धनंजय एदलाबादकर तर धुप प्रज्वलन सिद्धेश इले्ट्रोमेक चे संचालक दिपरत्न तायडे व नगरसेवक मुकेश वानखेडे यांच्या हस्ते होणार आहे.[ads id="ads1"]
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगांव येथे सर्व बहुजन महा मानवांच्या महामातांच्या संयुक्त जन्ममहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक शाहु,फुलेआंबेडकरी विचारांच्या किर्तनाचा कार्यक्रम प्रवज्जा फाऊंडेशन,नायगांवच्या वतीने तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी,नायगांवच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. [ads id="ads2"]
सदर हा कार्यक्रम दिनांक 23 मे रोजी संध्याकाळी ठिक ६.०० वाजेला सुरु होईल,तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की, मोठ्या संख्येने आपण या ऐतिहासिक विचारांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रवज्जा फाऊंडेशन नायगांवचे अध्यक्ष सारिपुत्त गाढे ,सचिव नितिन गाढे , प्रमोद सौंदळे ,किरण पोहेकर , व ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती