रावेर तालुक्यातील रायपूर येथील महिलेचा विनयभंग करून वडिलांना दिली जिवे ठार मारण्याची धमकी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा प्रतिनिधी/युसूफ शाह

सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायपूर या गावी महिलेचा विनयभंग करून त्या आरोपींनी फिर्यादी महिलेच्या वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून ही घटना रायपूर या गावात घडलेली आहे.[ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर वृत्त असे की सावदा शहरापासून साधारण 12 ते 16  कि.मी.अंतरावर रायपूर या गावांतील सुजाता सुनील बोदडे रा. सुरत व हल्ली मुक्काम रायपूर येथे रहिवास करीत असून गावातील संशयित आरोपी आकाश जिवन मोहासे व रोहन जिवन मोहासे यांनी फिर्यादी महिलेच्या अंगावर वरील कपडे फाडून तिच्या छातीवर, अंगावर,खाद्यावर,हाताने ओरखडून व फिर्यादीस मारहाण करून तिला लज्या येईल असे कृत्य करुन त्यांनी सदरील महीलेचा विनयभंग केला.[ads id="ads2"] 

  व फिर्यादीचे वडील शालिक दयाराम तायडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कपाळावर,नाकावर, काठीने व कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.तरी आम्ही दोघजण दोन दिवसात सुटुन आल्यानंतर तुम्हाला बंदुकीच्या गोळीने उडवून देवू.अशी धमकी सदरील आरोपींनी दिल्यामुळे त्यांच्या विरोधात सावदा पोलीस स्टेशन गु.र.नं.११२/२०२३ रोजी भा.द.वी.कलम३०७,३२६,४४८,३५४(अ)३२३,५०४,५०६,४२७,३४प्रमाणे दाखल असून. मुक्ताईनगरचे उपविभागीय अधिकारी प्रताप शिकारे पो.स्टे.ए.पी.आय.जलीदंर पळे, पो.उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. अनवर तडवी ,पो.हे.का.संजय चौधरी हे तपास करीत आहे.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!