रावेर तालुक्यातील "या" गावांना अवकाळी पावसाचा तडाखा कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रविवारी दिनांक 28 मे मध्यरात्री व 30 मे रोजी रावेर तालुक्यात (Raver Taluka)  वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने रावेर तालुक्यातील अंदाजे जवळ-जवळ 10 ते 11 कोटी रुपयांचे केळी बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वादळी पावसाचा रावेर तालुक्यातील(Raver Taluka)  जवळ-जवळ  14 ते 15 गावांना जबर फटका बसला असून शेतकरी राजा हवाल दिल झाला आहे. वादळी वारा व पावसामुळे नुकसानग्रस्त भागामध्ये ठिकठिकाणी  झाडे उन्मळून पडली असून काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.[ads id="ads1"] 

रविवार दिनांक 28 मे रोजी  मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाचा व वादळी वाऱ्याचा फटका रावेर तालुक्यातील (Raver Taluka) जवळ जवळ 14-15 गावातील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर एवढ्या शेत शिवाराला जबर फटका बसला आहे. या वादळाच्या तडाख्याने कापणीला आलेल्या केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उभे असलेले खोडे मोडून पडलेले आहेत. सुमारे ९ कोटी ६७ लाख ४ हजार रुपयांच्या नुकसानीचा अंदाज रावेर तालुका कृषी अधिकारी(Raver Taluka Agriculture Officer)  मयूर भामरे यांनी वर्तवला आहे.[ads id="ads2"] 

दिनांक 30 मे रोजी सुद्धा अवकाळी पावसाने, व वादळी वाऱ्यामुळे शेती शिवारात अजून नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात असून वादळी वाऱ्यामुळे रावेर शहरातील विजेची बत्ती गुल झाल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

हेही वाचा:  पेपर मिलला भीषण आग ; कोट्यवधी रुपयांचे नुकसान : जळगाव जिल्ह्यातील घटना

बाधीत गावे, शेतकरी संख्या व कंसात बाधीत क्षेत्र खालीलप्रमाणे 

विवरे खुर्द-१५(१८), वडगाव-७(८ ), चिनावल-३५(४९ ), जानोरी -१२(१८), अजनाड-२८ (१८), खिरवड-१५(१२), अभोडा बुद्रूक -१०(१२),  जिनसी-६(५), लालमाती-२(३), गुलाबवाडी-६(५),  रावेर- ५(३), खिरोदा प्र. रावेर-१(०.७६), चोरवड -३०(२०),खिरोदा प्र. यावल-१८(१४) कळमोदा-४०(५६)

तात्काळ पंचनामे सुरू रावेर तहसिलदार यांची माहिती

नुकसानग्रस्त केळी बागांचे नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषि विभागातर्फे सोमवारीपासून सुरू करण्यात आले आहेत. अंदाजे १० कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झाल्यावर तो वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती रावेर चे तहसीलदार यांनी दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!