महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन श्री महेंद्र दयाराम पाटील ,सचिव सौ. संगीता महेंद्र पाटील ,मुख्याध्यापक श्री कुंदन महाजन ,पर्यवेक्षक श्री मिलिंद दोडके ,शिक्षकवृंद , उपस्थित होते.[ads id="ads2"]
१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भाषावर प्रांत रचना कायदा लागू केल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्यनिर्मितीच्या या लढ्यामध्ये अनेक नागरिकांनी योगदान दिले. चळवळीदरम्यान १०६ हुतात्मांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.यासाठीही महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.
शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


