शुभम वाकचौरे (पुणे जिल्हा प्रतिनिधी) जांबुत, ता.शिरूर येथील शेततळ्यात बुडून बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मुलगा राजवंश आणि पती सत्यवान यांना वाचवण्यासाठी उडी मारलेल्या आईला वाचवण्यात यश आले.[ads id="ads1"]
जांबूत (पंचतळे) येथील बेल्हे, जेजुरी महामार्ग लगत चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र आहे हे कृषी पर्यटन केंद्र शिवाजी गाजरे यांच्या मालकीचे आहे या ठिकाणी ते कुटुंबासह राहतात रविवारी दिनांक 30 चार ते पाच च्या सुमारास सत्यवान शिवाजी गाजरे ( वय 25 ) पत्नी स्नेहल सत्यवान गाजरे हे आपल्या राजवंश या दीड वर्ष वयाच्या मुलासह शेतात होते.[ads id="ads2"]
त्यांची नजर चुकवत खेळत खेळत राजवंश हा स्विमिंग टॅंकमध्ये( तळ्यात ) पडला. वडील सत्यवान शिवाजी गाजरे याने मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली सत्यवान ला पोहता येत नसल्यामुळे तोही पाण्यात बुडू लागला सत्यवान यांची पत्नी स्नेहल हिने पती मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली मात्र तीही पाण्यात बुडू लागल्याने तिच्या ओरडण्याचा आवाजाने किरण गाजरे , वेटर व इतरांनी घटनास्थळी धाव घेत बुडत असलेल्या स्नेहल हिला बाहेर काढले .सत्यवान व राजवंश यांनाही बाहेर काढून आळेफाटा येथे उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले डॉक्टरांनी तपासून पाहिल्यावर उपचारापूर्वी दोघांनाही डॉक्टरांनी मयत घोषित केले या दुर्देवी घटनेची माहिती कळताच जांबुत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


