यावल (सुरेश पाटील) यावल वन विभाग जळगाव या जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या यावल पूर्व व पश्चिम वनपरिक्षेत्रात अतिक्रमण करण्यासाठी अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून 40 ते 50 हजार रुपये घेऊन अतिक्रमण करण्याची अनधिकृत बेकायदा आणि तोंडी परवानग्या दिल्या असल्याचे तसेच सातपुडा जंगलातील वन उत्पादित सागवानी व इतर मूल्यवान लाकडांसह डिंक तस्करी प्रकरणात संबंधितांनी कोट्यावधी रुपयाची कमाई केल्याचे आणि गेल्या आठ महिन्यापूर्वी यावल पूर्व वनक्षेत्रातील फरार झालेल्या आरोपी प्रकरणात संबंधित जबाबदार अधिकारी बडतर्फ किंवा निलंबित न झाल्याने यावल वन विभाग जळगाव कार्यालयाच्या भोंगळ कारभाराबाबत यावल,रावेर, व चोपडा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"]
गारबर्डी राखीव वनक्षेत्रातील 8 हेक्टर अतिक्रमण काढले,गारबर्डी सुकी धरणाच्या परिसराने घेतला मोकळा श्वास.असे वृत्त गेल्या आठवड्यात संबंधित वन अधिकाऱ्यांनी आपली स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी ठराविक प्रसिद्धी माध्यमांना माहिती देवून प्रसिद्धी करून घेतली. इतर काही प्रसिद्धी माध्यम वस्तुस्थितीला प्राधान्य देऊनच बातम्या देत असल्याने त्यांच्याकडे संबंधित वन अधिकारी माहिती देत नाहीत ही यावल पूर्व व पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची वस्तुस्थिती आहे.[ads id="ads2"]
यावल पूर्व व पश्चिम परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून फक्त १० ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वड़री धरण परिसरात अतिक्रमण केलेल्या प्रत्येक नागरिकांकडून 40 ते 50 हजार रुपये घेऊन अतिक्रमण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे यासह इतर अनेक ठिकाणी सातपुड्यात अनधिकृतपणे बेकायदा अतिक्रमण झाले आहे,झालेले अतिक्रमण यावल पूर्व व पश्चिम वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिसून येत नसल्याने तसेच समजत नसल्याने आणि सातपुडा जंगलातील सागवानी लाकडासह इतर मूल्यवान लाकडाची अवैध वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात सर्रासपणे तस्करी सुरू आहे यात सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्यांकडून दरमहा लाखो रुपयाचे हप्ते कोण गोळा करतो,सातपुडा जंगलात वन उत्पादित डिंक व इतर अनेक मौल्यवान वस्तूची तस्करी सुरू असताना यावल पूर्व व पश्चिम वन विभागात किती लोकांवर कारवाई झाली ? अनेकांवर कारवाई का झाली नाही? आणि कारवाई केली असेल तर प्रसिद्धी माध्यमांना एकाच वेळेला माहिती का दिली जात नाही हा संशोधनाचा विषय आणि प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या 8 महिन्यापूर्वी डोंगरदा परिसर पैझरी भागातून पकडलेल्या आरोपी पैकी 3 आरोपी यावल पोलीस स्टेशन आवारातून फरार झाले होते आणि आहेत, हे प्रकरण संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह धुळे मुख्य वनसंरक्षक विभाग पासून नागपुर येथील प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयापर्यंत चांगलेच गाजले चांगलेच गाजले असले तरी इतर विभागात संबंधित अधिकारी,कर्मचारी यांच्याकडून कर्तव्य करताना कसूर झाल्यास किंवा आरोपी फरार झाल्यास त्यांना तात्काळ बडतर्फ किंवा निलंबित करण्यात येते.परंतु आरोपी फरार झाल्यावर सुद्धा आजपर्यंत यावल पूर्व वन परिषेत्र अधिकारी पदमोर यांच्यावर कारवाई न झाल्याने यावल वन विभाग जळगाव यांच्या कार्यालयापासून तर मुख्य वन संरक्षक धुळे,प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनबल प्रमुख ) नागपूर यांच्या कार्यालयापर्यंत 25 ते 30 पेट्यांची उलाढाल झाली असल्याने दोषी जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई झाली नाही असे यावल वन विभाग जळगाव कार्यक्षेत्रात बोलले जात आहे.