असुरक्षित असल्याने नागरिकांमध्ये घबराट ?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल (सुरेश पाटील) यावल शहर व परिसर असुरक्षित असल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे,ठिक- ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असताना घडलेल्या घटनांबाबत कार्यवाही होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकात,जनतेत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"] 

         दि.20 शनिवार रोजी सकाळी 2 वाजेच्या सुमारास यावल शहरातील मेन रोडवरील एका वकिलाच्या घराचे दर्शनी भागावरील दरवाज्याचे कडी कोंडा तोडून घरात घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला परंतु घरात पुन्हा मजबूत दरवाजा असल्याने चोरट्यांचा चोरी करण्याचा तथा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला मेन रोडवर चोरटे फिरत असल्याचे सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे यामुळे मात्र मेन रोडवरील व्यापारी व प्रतिष्ठित रहिवासी नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.[ads id="ads2"] 

         शहरात इतर ठिकाणी सुद्धा अनेक क़िरकोळ प्रकार घडत आहेत.

         यावल शहरात बुरुज चौकाजवळ भर रस्त्यावर आणि मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या रस्त्यावर आणि ते सुद्धा धार्मिक स्थळाच्या प्रवेशद्वारासमोरच रस्त्यात स्पीड ब्रेकर/ गतिरोधक सारखी अर्धा फूट खोल आडवी चारी पडली आहे गेल्या तीन महिन्यापासून भर रस्त्यात पडलेली ही चारी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे तरी सुद्धा यावल नगरपरिषद बांधकाम विभागाला दुरुस्त करता आली नाही हे यावल शहरातील सर्व जाती-धर्माचे दुर्भाग्य म्हणावे लागेल या ठिकाणी रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत असून एखाद्या वेळेस मोठी अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

      भुसावळ टी पॉइंट पासून सम्राट सुपर मॉल पर्यंत दररोज सकाळी केळीचे ट्रक व केळी ट्रक मध्ये पाणी भरत असल्याने यावल भुसावळ रोडवर या ठिकाणी जड वाहनांसह एसटी बसेस इतर चार चाकी वधूसाठी वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असते या ठिकाणी दररोज सकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनधारकांचा नागरिकांचा जमाव जमत असतो परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल,यावल नगरपरिषद आणि यावल पोलिसांचे 'अक्षम्य'असे दुर्लक्ष होत असल्याने संपूर्ण यावल शहरासह परिसरात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे आणि या ठिकाणी सुद्धा एखाद्या वेळेस मोठी अप्रिय घटना घडू शकते असे बोलले जात आहे.

        यावल शहरात 75 टक्के भागात आणि नगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर रहदारीस ठिकठिकाणी अडथळे निर्माण कशामुळे होत आहेत हे नगरपरिषदेला,यावल पोलिसांना,महसूल यंत्रणेला चांगल्या प्रकारे ज्ञात असताना प्रत्यक्ष दिसत  असताना कारवाई  का नाही ? बोरावल दरवाजा परिसरात व मेन रोडवर सर्रास बनावट पन्नी दारू विक्री होत आहे यामुळे भावी तरुण पिढीचे जीवन आणि आयुष्य व त्यांचा संसार उध्वस्त होत आहे याबाबत कोणी फिर्याद तक्रार देत नसेल तर शासकीय यंत्रणेला स्वतः फिर्यादी होऊन कारवाई करून जनहित साध्य करायचे असते परंतु शासकीय यंत्रणे सोबत राजकीय,सामाजिक व काही संघटना समन्वय साधून जनहित साध्य करीत नसल्याने संबंधित अधिकारी आपला 3 तीन वर्षाचा कालावधी वैयक्तिक हेतू साध्य करीत आणि वरिष्ठांची दिशाभूल करीत आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करीत असतो याबाबत काही लोकप्रतिनिधींना सामाजिक हीत साध्य करणे कामी आत्मचिंतनाची गरज आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!