नाचताना चक्कर येऊन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) नातेवाईकांकडे असलेल्या धार्मिक कार्यक्रमात नाचताना चक्कर येऊन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना चोपडा शहरात (Chopda City) घडली असून, संदीप नीळकंठ चव्हाण (वय २४, रामपूरा, पारधीवाडा) असे मयताचे नाव आहे.या घटनेने चोपडा शहरात (Chopda City) हळहळ व्यक्त केली जात आहे.[ads id="ads1"] 

चोपडा शहरातील(Chopda City)  रहिवासी संदीप चव्हाण याच्या काकांकडे कुलदैवताचा नवसाचा धार्मिक कार्यक्रम होता. यानिमित्त रात्रभर कार्यक्रम सुरु होता. याच कार्यक्रमात धार्मिक गाण्यांवर संदीप नाचत होता. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नाचता नाचता संदीपला अचानक चक्कर आले आणि तो जमिनीवर पडला. [ads id="ads2"] 

  त्याला तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात  (Chopda Civil Hospital) दाखल केले. याठिकाणी डॉ. प्रसाद पाटील यांनी संदीप यास मृत घोषित केले. मृत्यूच्या काही तासांपूर्वी संदीपने चुलत भावाच्या लग्नाच्या वाढदिवस साजरा केला होता. त्यामुळे ज्या घरात धार्मिक कार्यक्रमानिमित्त आनंदाचे वातावरण होते, त्याठिकाणी अवघ्या क्षणातच शोककळा पसरली. संदीप याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!