रावेर तालुक्यातील लोहारा धरणातील गाळ काढण्याची मागणी,अन्यथा....बिरसा फायटर्स तर्फे ठिय्या आंदोलन करणार : हसन तडवी यांची माहिती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (हसन तडवी) रावेर तालुक्यातील लोहारा धरणातील गाळ काढण्यात यावा ,अशा मागणीचे निवेदन संदेश आदिवासी बिरसा फायटर्स संघटनेचे राज्य प्रशिध्दी प्रमुख हसन तडवी  यांनी मा.तहसिल कार्यलय पोहोच आणि मा.उपविभागीय जलसंधारण अधिकारी,जलसंधारण उपविभाग रावेर विनय पदमाकर कुलकर्णी ह्या हॉफिस ला एस.आर.मोरे क.सहा.यांच्याकडे सादर केले आहे.[ads id="ads1"] 

  लोहारा गाव आणि परिसरा तील शेतीसाठी  पाणी मिळावे म्हणून सुकी धरण बांधले आहे लोहारा धरण सन १९ /७२  मध्ये बांधण्यात आले. तेव्हापासून धरणात प्रचंड गाळ साचले आहे गाळ उपसा झाल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होवून आता आणि भविष्यात पाणी टंचाईवर मात करता येईल.[ads id="ads2"] 

लोहारे धरण हे ५१ वर्षे जुने असुन अनेक गाव अनेक शेतकरी पाण्यासाठी सुखी धरणा वरती अवलंबून आहेत.लोहारा धरणात प्रचंड गाळ साचले असून धरणात दगड.गोटे .कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे.तसेच धरणात गाळ साचून काटेरी झाडे झुडपे .पन्हेड वाढलेली आहे.त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी कमी झाली आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धरणातील पाण्याचा  उपयोग होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

म्हणून लोहारा धरणातील गाळ लवकरात लवकर उपसण्याची कार्यवाही करण्यात यावी .हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स तर्फे तहसिल कार्यालय   रावेर समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.याची नोंद घ्यावी कळावे असे महाराष्ट्र राज्य बिरसा फायटर्स चे प्रसिद्धी प्रमुख हसन तडवी यांनी निवेदनात म्हटले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!