विद्युत मोटारीचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)

यावल तालुक्यातील कोळवद येथील संजय  मुस्कान तडवी वय 14,  ही चिमुकली आपल्या राहत्या घरात पिण्याचे पाणी भरण्यासाठी विद्युत मोटारीचा वापर करीत असताना तडवी सायंकाळी नळाला पाणी आल्यामुळे चिमुकली  पाणी भरत होती. पाणी भरत असताना अचानक तिला विद्युत मोटारीचा शॉक लागला आणि ती बेशुद्ध पडली.[ads id="ads1"]  

 नळाचे पाणी भरताना विद्युत मोटारीचाशॉक लागून 14  वर्षीय  चिमुकली चा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पिण्याचे पाणी भरताना विजेचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती कळतात गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. [ads id="ads2"]  

  चिमुकली घरात एकटी होती आई वडील बाहेर गावी असताना हा प्रकार घडला आहे, मुस्कान बेशुद्ध अवस्थेत असल्याने आढळून येतात घराजवळील नागरिकांनी  एकच गर्दी केली, मुस्कान तडवी ही सतो द  येथील विकास विद्यालयात  आठवीच्य वर्गात शिक्षणं घेत होती, दरम्यान या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!