रावेर ( मुबारक तडवी ) रावेर तालुक्यातील अंकलेश्वर -बुरहानपुर महामार्गावरील मोठा वाघोदा बु. सावदा रस्यादरम्यान रस्त्यावर श्रीकृष्ण पेट्रोल पंप जवळ गुरुवार रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास धागा भरून जाणार्या चालत्या आयशर वाहनाला अचानक आग लागली.यात कोणतीही जिवित हानी झाली नाही.तर वाहन संपूर्णपणे जळून खाक झाले आहे.[ads id="ads1"]
त्या वाहना मध्ये धागा (दोरा) होता ते वाहन बुरहानपुर येथे दोऱ्याचे बंडल घेवून जात असल्याचे माहिती समोर येत आहे.तसेच सदर वाहनास आग लागल्याचे समजताच ड्राइवर ने गाडी थांबवुन उडी घेतली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली असता सावदा येथील अग्नीशामक दलाकडुन आग विझवण्यासाठी बंब मागविण्यात आले. [ads id="ads2"]
मात्र एका बंबाने ही आग आटोक्यात येत नव्हती.तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी दुसरा बंब ही मागवण्यात आला होता.वाहनाला लागलेल्या आगीचे कारण हे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सदर घटनास्थळी वाघोदा येथील गावकरी हे रात्रीच्या वेळेस धावून आले व त्यांनीही वाहनाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रयत्न केले


