सावदा प्रतिनिधी/युसूफ शाह
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे दिनांक १३ मे २०२३ रोजी दुपारी १२-२० वाजेच्या सुमारास शहरातील एका ५० वर्षीय प्रौढ व्यक्तीने शेतातील विहीरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.[ads id="ads2"]
याबाबत अधिक माहिती अशी की,सावदा येथील सुरेश किटकुल लोखंडे ह्या व्यक्तीने शहरा लागत पनापीर दर्गा जवळील शेतकरी प्रमोद शंकर चौधरी यांच्या शेतातील उघड्या विहिरीत उडी घेऊन व पाण्यात बुडून आपले जीवन संपविले.ही खबर मिळताच पोलीसांनी पोहणाऱ्या इसम बोलावून त्यास विहीरीत उतरवले व विहीरीतून लोकांच्या मदतीने सदर प्रौढाचे प्रेत बाहेर काढले,विहीरीत पडल्याने त्याचे पायावर जखमा झालेल्या असून,[ads id="ads2"]
याबाबतची खबर हर्षवर्धन सुपडू कोचूरे.रा.सावदा ता.रावेर.यांनी सावदा पोलीस स्टेशनला स्वतः हजर राहून दिली,या विहिर खोल असून त्यातळ पाणी असल्याकारणाने सदरील व्यक्ती मृत्यूमुखी पडलेली होती.तरी या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात अ.मुशनं.१२/२०२३ सी.आर.पी.सी.चे कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आलेली असून,पुढील तपास एएसआय महेमुद शाह करीत आहे.


