यावल- रावेर तालुक्यात 'शिवराज्याभिषेक दिन' दिवाळी सणाप्रमाणे साजरा करणेची जय्यत तयारी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


आश्रय फाउंडेशनचे 2 जून पासून घरघर भगवा अभियान

यावल (सुरेश पाटील) जून 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा ( हिंदवी स्वराज्य ) राज्याभिषेक झाला होता आणि आहे.या ऐतिहासिक कार्यक्रमाची माहिती आणि जनजागृती होण्यासाठी 2 जून 2023 पासून सप्ताहात यावल- रावेर तालुक्यात 'शिवराज्याभिषेक दिन' दिवाळी सणाप्रमाणे साजरा करणेची जय्यत तयारी. [ads id="ads1"] 

  संपूर्ण यावल- रावेर तालुका स्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या आश्रय फाउंडेशन तर्फे 2 जून रोजी घरघर भगवा अभियान विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविण्याची जय्यत तयारी केली असल्याची माहिती आश्रय  फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन सुधाकरराव फेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.[ads id="ads2"] 

      त्यांनी माहिती दिली की ऐतिहासिक संस्कृती जपणूक होईल आणि संस्कृती जपण्यासाठी तसेच शिवाजी महाराज यांचा उज्वल इतिहास नागरिकांना व भावी पिढीला ज्ञात व्हावा त्यांचा आदर्श घेतला जावा म्हणून शिवरायांचा 350 वा राज्याभिषेक 'दिन' आपण संपूर्ण यावल रावेर तालुक्यात दिवाळी सणासारखा साजरा करणार असून या सप्ताहात यावल रावेर तालुक्यातील सर्व स्तरातील महिला- पुरुष तरुण-तरुणी यांनी आपल्या घरासमोर सुंदर रांगोळी काढून रात्री दिवे लावून शिवरायांचा राज्याभिषेक दिन साजरा करायचा आहे असे आव्हान त्यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

       श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे महान वर्णन असलेल्या पत्रिका तसेच 21 हजार भगवे ध्वज,स्टिकर्स, कार्यपत्रिकेचे वाटप करून श्री छत्रपती शिवाजीराजे महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती डॉ.कुंदन फेगड़े यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!