यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील साकळी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय जळगाव व मनोकामना लोकसंचालित साधन केंद्र यावल आणि पोलीस मित्र मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात घरगुती व सार्वजनिक होणाऱ्या हिंसाचारावर प्रतिबंधकरणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले.[ads id="ads1"]
दि.17 रोजी यावल तालुक्यातील साकळी पोलीस दुरक्षेत्र येथे पोलीस व माविम मित्र मंडळ याची संयुक्त बैठक घेण्यात आली त्यात घरगुती हिंसाचार सार्वजनिक् हिंसाचार प्रतिबधात्मक आणी तक्रार निवारण बाबत मार्गदर्शन करण्यात आले.[ads id="ads2"]
त्यात जिल्हा महिला वा बाल् विकास विभाग वं संरक्षण विभाग यांची याबाबत भूमिका जबाबदारी त्यांचे हेल्पलाईन नंबरची माहिती संरक्षण अधिकारी प्रतिक पाटील यांनी दिली पोलिस आणी माविम मित्र मंडळाची भूमिका काय? या बाबत जिल्हा समन्वयक अधिकारी माविम उल्हास पाटील सर यांनी मार्गदर्शन केले तसेच हे.कॉ.सिकंदर तडवी यांनी हिंसाचार रोखण्याबाबतचे कायद्याबाबत मार्गदर्शन केले प्रस्थावना माविम तालुका व्यवस्थापक आशिष मोरे यांनी केले आभार जावेद तडवी यांनी म्हणाले त्यावेळी rgb सदस्य व माविम मित्र मंडळ उपस्थित होते.