अज्ञात वाहनाच्या धडकेत धमनार -वसमार रस्त्यावर बिबट्याचा जखमी होऊन प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धमनार ते वसमार रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी होऊन प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली आहे.[ads id="ads1"] 

धमनार ,म्हसदी, काळगाव,वसमार शिवारात मागील काही वर्षांपासून बिबट्यांचा वावर गाव शिवाराकडे होताना दिसत आहे ,बिबट्या रात्री पशुधनाची शिकार करण्यासाठी गावाकडे येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे, शनिवारी रात्री जंगल शिवारातून शिकारीचा शोध घेत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांकडून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली.[ads id="ads2"] 

   घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी डी.आर.अड़कीने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी.पी पगारे, एल.आर.वाघ व वन कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, बिबट्याच्या मृतदेहाचे  शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी माहिती वन अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. 

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

हेही वाचा: अज्ञात वाहनाच्या धडकेत धमनार -वसमार रस्त्यावर बिबट्याचा जखमी होऊन प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू

हेही वाचा:  पेपर मिलला भीषण आग ; कोट्यवधी रुपयांचे नुकसान : जळगाव जिल्ह्यातील घटना

बिबट्या हा नर जातीचा असून वन अधिकाऱ्यांकडून धडक देणाऱ्या वाहनाचा शोध सुरू आहे , घटनास्थळी वसमार गावाचे सरपंच समाधान येळीस, उपसरपंच भटू नेरे, सुशील नेरे, मच्छिंद्र नेरे, धमनार चे जितेंद्र खैरनार, संदीप खैरनार आदि घटनास्थळी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!