रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने आज दिनांक12,5,2023 शुक्रवार रोजी सकाळी 11. वाजता जुने तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त गरीब व गरजू आदिवासी वंचित समाजाच्या महिला पुरुषांना चपला, बूट वाटप रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, जिल्हा संघटक शेख याकूब शेख नसीर, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बॅग, तसेच माजी नगरसेवक एड. योगेश गजरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.एकूण 40 महिला ,पुरुषांना चपला व बूट वाटप करण्यात आले.[ads id="ads2"]
याप्रसंगी रतन भालेराव, अर्जुन वाघ, ज्ञानेश्वर तायडे, रघुनाथ कोघे , कंदरसिंग बारेला, अजय तायडे, कैलास तायडे, चंद्रसिंग बारेला, राजेंद्र तायडे, योगेश निकम शेख इमरान इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



