पत्रकार रतनकुमार साळवे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


औरंगाबाद (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दि १४ सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने निळे प्रतीक या वृत्तपत्राचे संपादक,तथा एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांना सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने दिलेला,प्रतिष्टेचा समजला जाणारा, समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवराच्या  हस्ते गौरविण्यात आले. रतनकुमार साळवे यांच्या कार्याची  वेळोवेळी समाजाने दखल घेतली आहे.[ads id="ads1"] 

  आतापर्यंत त्यांना विविध संस्था, संघटनाच्या वतीने ३५ पुरस्कार मिळालेले आहे. तें गेल्या २० वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कामाची चुनक आपल्याला बघायला मिळते. तें पत्रकारांचे प्रश्नही हिरीरीने सोडवत असतात. त्यांना राज्यस्तरिय सुध्दा पाच पुरस्कार मिळालेले आहे. सामाजिक कार्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा त्यांनी ठसा उमटवलेला आहे. समाज सेवाभान जपत निळे प्रतीक बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेची अंतर्गत तें विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करत असतात. त्यांचे आतापर्यंतचे कार्य हे उल्लेखनीय असेच आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रो. शरद बाविस्कर ( jnu दिल्ली ) यांच्या हस्ते रविवारी औरंगाबाद मध्ये समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.[ads id="ads2"] 

यावेळी सिद्धार्थ मित्र मंडळाचे अध्यक्ष, प्रकाश कांबळे, प्रा. किसन चव्हाण, सुधाकर मेश्राम, एम.एन.ढाकरगे,डॉ. संदेश भित्रे, एन. डी. जिवणे,एल एस.कांबळे, एस के. कांबळे आदीची उपस्थिती होती.हा सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र टी.व्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न झाला.या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्विनी मनवर यांनी केले तर आभार सुधाकर मेश्राम यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!