युवक काँग्रेस ची आढावा बैठक संपन्न व फैजपूर शहराध्यक्षची नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



सलीम पिंजारी (फैजपुर प्रतिनिधी ता.यावल)

फैजपूर : दिनांक १६ रोजी येथे रावेर यावल विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस ची आढावा बैठक जिल्हा अध्यक्ष श्री देवेंद्र मराठे यांचे आदेशान्वये घेण्यात आली.सदर बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार उल्हसदादा पाटील व प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरिशदादा चौधरी यांचे नेत्रुत्व खाली पक्ष वाढवण्यास व पुढील निवडणुकीस पक्षाची भूमिका बद्दल चर्चा करण्यात आली.[ads id="ads1."] 

बैठक चे  अध्यक्ष स्थान जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे तर  प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव श्री डॉ.शोएब पटेल व  सोशल मीडिया चे जिल्हा अध्यक्ष श्री मकसुद पटेल होते. आयोजक रावेर यावल  युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष फैजान शाह होते.[ads id="ads2"] 

सूत्रसंचालन जिल्हा महासचिव रामराव मोरे यांनी केले व आभार विधानसभा अध्यक्ष फैजान शाह यांनी मानले,या वेळी विधानसभा अध्यक्ष यांनी फैजपूर शहराअध्यक्षांचे नावाची घोषणा केली फैजपूर येथील रहिवासी माजी उपनगरध्यक्ष श्री वसीम मेहबूब तडवी यांना प्रदेश सचिव डॉ.शोएब पटेल व जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांचा हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळीस उपस्थित मा.नगरसेवक केतन किरंगे, मा. नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, शहर अध्यक्ष रियाझ मेंबर, कलीम मेंबर, आसिफ मेकॅनिक,जिल्हा सरचिटणीस रामराव मोरे, एनएसयुआय जिल्हाउपाध्यक्ष हर्षल दाणी,डॉ दानिश, एजाज़ सर, अमोल चौधरी, कुणाल चौधरी, सागर चौधरी, टीनू सोनार, आदींनी तडवी यांचे अभिनंदन केले,

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!