भुसावळ नाहाटा महाविद्यालयाला विद्यापीठाचा 'अ' दर्जा प्राप्त

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



सलीम पिंजारी  (फैजपुर ता. यावल प्रतिनिधी)

 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव यांनी तीन वर्षाचे अकॅडमिक ऑडिट झालेल्या महाविद्यलयांची यादी नुकतीच जाहीर केली. या जाहीर करण्यात आलेल्या महाविद्यलयांच्या मानांकनामध्ये भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ ने 'अ' दर्जा चे मानांकन नुकतेच प्राप्त केले आहे.[ads id="ads1"] 

विद्यापीठाच्या वतीने या मानांकनाकरिता विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये भुसावळ नाहाटा महाविद्यालयाने अ दर्जा प्राप्त केले आहे, नुकतेच महाविद्यालयास चौथ्या Cycle साठी 'अ' दर्जा NAAC कडून प्राप्त झाला आहे.[ads id="ads2"] 

महाविद्यालयाला मिळालेल्या या यशाबद्दल समाधान व्यक्त करतानाच ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री मोहन भाऊ फालक, चेअरमन श्री महेश भाऊ फालक, सचिव श्री. विष्णू भाऊ चौधरी, कोषाध्यक्ष श्री संजयजी नाहाटा महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी, डॉ. एन. ई. भंगाळे यांनी यात सहभागी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे आणि पुढे ही अश्याच यशाची परंपरा महाविद्यालयाने सुरु ठेवावी असा मनोदय व्यक्त केला आहे आणि सर्वाना शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!