रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा)- ग्रामपंचायत करांची थकबाकी हा प्रत्येक ग्रामपंचायतीचा जटील प्रश्न आहे.याकरिता विवरे खुर्द (ता.रावेर) येथील ग्रामपंचायतीने *सन्मान तुमचा* हा अनोखा उपक्रम राबवत,अधिकाधिक ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.वेळेत ग्रा.प,कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांच्या हातून ध्वजारोहण करण्याचा हा उपक्रम आहे.या उपक्रमाची जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे.ध्वजारोहण हा सरपंच सौ.स्वराताई संदीप पाटील यांचा विशेष अधिकार असूनही त्यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या हातून ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांच्यावर देखील कौतुकाची थाप पडत आहे.[ads id="ads1"]
येथील ग्रा.प.अनेक योजना उपक्रम सुरु करण्यासाठी प्रसिद्ध होत आहे.विवरे खुर्द ग्रामपंचायतीची कर वसुली वेळेवर व मोठ्या प्रमाणात व्हावी.यासाठी *सन्मान तुमचा* या नावाने उपक्रम काही दिवसाआधी सुरु केला आहे.ज्या मालमत्ता धारकांकडे घरपट्टी,पाणीपट्टी व अन्य करांची थकबाकी आहे.त्यांनी १० एप्रिल २४ पर्यंत १०० टक्के करभरणा केला तर त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीत १५ ऑगस्ट,२६ जानेवारी,१ मे रोजी होणारे ध्वजारोहण केले जाणार आहे.या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वेळेत कर भरून यात सहभाग घेतला त्यामुळे कुणाच्या हस्ते ध्वजारोहण करावे,हा यक्षप्रश्न उभा राहिल्याने,कर भरणाऱ्या नागरिकांच्या नावाची चिठ्ठी सोडत (लकी ड्रॉ) दि.१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून काढण्यात आली.त्यावेळी तिघांची नांवे जाहीर करण्यात आले.[ads id="ads2"]
त्यातील सौ.सुनिता भीमराव विचवे यांनी पती भीमराव विचवे,सासू-सासरे,मुले व परिवारातील सदस्यांच्या उपस्थिती १ मे रोजी ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण केले.याप्रसंगी सरपंच सौ. स्वराताई पाटील,उपसरपंच दीपक गाढे,ग्रामविकास अधिकारी अतुल पाटील,माजी पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे,ग्रामस्थ दामू अण्णा विचवे,शामराव विचवे,सिंधुबाई विचवे,ग्रा.प.सदस्य संदीप पाटील,सुभाष पाटील,नासिमबी शेख,घनश्याम बखाल,विकासो चेअरमन वसंत सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.या उपक्रमाची मोठी चर्चा होत आहे. या व्यतिरिक्त या योजनेत कर भरून सहभाग घेणाऱ्या नागरिकांना कचरापेटी मोफत वाटप करण्यात आले.
-----
यांना मिळणार ध्वजारोहण करण्याचा मान
१ मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्ताने होणारे ध्वजारोहण भीमराव विचवे व त्यांच्या परिवारांच्या हस्ते,१५ ऑगस्ट रोजी ग्रा.प.उपसरपंच दीपक जगन्नाथ गाढे,२६ जानेवारीला उमेश निवृत्ती महाजन यांच्या नावाची सोडत निघाली असल्याने,त्यांच्या हस्ते परिवाराच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे.
-------
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायत नव-नवीन उपक्रम राबवत आहे,'एक कुटुंब एक झाड' हि योजना देखील आम्ही आणली होती.त्यावेळी सुद्धा ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाले.असे निरनिराळे उपक्रम राबवण्यावर आमचा भर राहील.यंदा करवसुलीच्या उदिष्टे पूर्ती साठी सन्मान तुमचा हा उपक्रम राबविण्यात आला,त्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांना खूप आनंद आहे.सामान्य परिवाराला ध्वजारोहण करण्याचा अधिकार मिळाला हि त्यांच्या दृष्टीने खूप सन्मानाची बाब आहे.
सौ.स्वराताई संदीप पाटील,सरपंच विवरे खुर्द
----



