रावेर तालुक्यातील रसलपूर (Rasalpur Taluka Raver Dist Jalgaon) गावात रविवारी ७ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील एका घरासमोरील गटारीत तीन ते चार दिवसांचे नवजात मेलेले अर्भकाला टाकून दिल्याचे समोर आले. हे अर्भकाची जन्माची लपवणूक करण्याच्या उद्देशाने उघड्या गटारीत टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. [ads id="ads2"]
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलीसांनी (Raver Police Station) घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी गावातील पोलीस पाटील प्रविण धनके यांनी रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) फिर्याद दिली आहे.
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
त्यानुसार रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रावेर पोलिस स्टेशन (Raver Police Station) चे पोलीस नाईक जगदीश पाटील करीत आहे.



