रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेरमधील व्यापारी मोहनलाल पटेल यांची बांधकामास लागणारे स्टिल मटेरीयल पाठवण्याच्या आमिषाने 16 लाखांत ऑनलाईन फसवणूक झाली होती. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर दुसर्याला सायबर पोलिसांनी मुंबईमधून अटक केली आहे. मोहम्मद आफताब असगर अली (43, साकीनाका, मुंबई) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.[ads id="ads1"]
फसवणूक प्रकरणी दाखल होता गुन्हा
मोहनलाल देवजी पटेल (60, रा.गजानन नगर, रावेर) यांनी याबाबत जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती. मोहनलाल देवजी पटेल यांना संशयित ललितकुमार तुलसीराम खंडेलवाल (38, रा.छिपावली, ता.जि.सिरोही, राजस्थान) याने फोनवरून ‘आमची आयएसओ टॉप्स इंडिया मेटल ट्रेडर्स’ नावाची कंपनी असून आम्ही तुम्हाला बांधकामासाठी लागणारे स्टिल मटेरीयल पाठवितो, असे सांगून विश्वास संपादन केला. 19 ते 21 नोव्हेंबर दरम्या
दुसर्या संशयितालाही मुंबईतून अटक
या प्रकरणात दुसरा संशयित आरोपी मोहम्मद आफताब असगर अली (43, साकीनाका, मुंबई) हा निष्पन्न झाला होता. त्यानुसार त्याचा शोध सुरू होता. त्याची माहिती मिळाल्यावर पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास त्याला मुंबई येथून अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पोलीस कर्मचारी श्रीकांत चव्हाण, वसंत बेलदार, ललित नारखेडे आदींनी आरोपीला अटक केली.



