ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे विजेचा नेहमी लपंडाव सुरू आहे.सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे ३३के.व्ही. चे सबस्टेशन असून या सबस्टेशन वरून सात ते आठ गावात वीज पुरवठा केला जातो परंतु काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या दिरंगाई मुळे वीजपुरवठा सतत खंडित होत आहे.[ads id="ads1"]
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गर्मी मुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यात वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक खुप त्रस्त झाले आहेत रात्री बेरात्री वीज पुरवठा खंडीत होत असतो मात्र वीजवितरण कंपनी चे एक ही कर्मचारी गावात राहत नसून सर्व कर्मचारी बाहेर गावाहून ये जा करीत आहेत कर्मचाऱ्यांच्या ज्या गावात नोकरी आहे त्या गावात राहणे बंधनकारक आहे परंतु साहेबा पासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत एकही राहायला गावात नाही त्यामुळे नागरिकांना खुप अडचणीचा सामना करावा लागत आहे.[ads id="ads2"]
कर्मचाऱ्यांच्या दुरध्वनी वर संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे व कर्मचारी गावात राहायला आले पाहिजे यामुळे सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत चालू राहील अशी मागणी नागरिकांनी केली आहे.