मा. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री संदिप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग, मा. श्री. सतिष कुलकर्णी, परि उप विभागीय पोलीस अधिकारी, मा.श्री आप्पासाहेब पवार परि उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री. किसन नजनपाटील, वरिष्ट पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, श्री शंकर शेळके, पोलीस निरीक्षक, शनिपेठ पो स्टे यांनी बँकेतील कर्मचारी व बैंक मैनेजर (फियांदी) यांना वेगवेगळी विचारपूस केली असता बँकेतील स्टाफ तसेच फिर्यादी व मनोज सूर्यवंशी याचे हकिगत मध्ये तफावत आढल्याने मनोज सुर्यवंशी याचेवर संशय वाढल्याने त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, सदरचा गुन्हा हा माझा पाहुणा शंकर जासक व त्यांचे वडील रमेश जासक असे आम्ही मिळून केला असून सदर जबरी चोरीतील नेलेले सोन्याचे दागीने व पैसे पाहुणे शंकर जासक हे त्यांचे घरी कर्जत येथे घेवून गेले आहेत आहे. असे कळवले.[ads id="ads2"]
त्यावरून श्री. किसन नजनपाटील, वरिष्ट पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी ३ पोलीस पथक तयार करून पथकात मा. श्री आप्पासाहेब पवार परि उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री शंकर शेळके, पोलीस निरीक्षक, शनिपेठ पो.स्टे. श्री. गणेश वाघमारे, पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे सोबत स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांचे वेगवेगळे पथक यांनी अविरत कामकाज करून तसेच शनिपेठ पो.स्टे. कडील पोलीस अधिकारी / अमलदार PSI चांदलकर, पोउनि मुबारक तडवी, पोह परिष जाधव, राहूल पाटील, अनिल कांबळे, राहूल घेटे, विजय निकम, किरण वानखेडे, मुकुदा गंगावणे, अमोल विसपुते, गिरीष पाटील, अश्वीन हडपे, अभिजीज संदाणे, सुनिल पवार, इंगळे यांचे पथक तयार करून कर्जत येथे पाठवून शंकर जासक यांचा मिळाले पत्यावर शोध घेवून त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता समजुन आले की, तो पोलीस उप निरीक्षक पदावर रायगड जिल्ह्यात नेमणुकीस असून ऑक्टोबर २०२१ पासुन कर्तव्यावर गैरहजर असल्याचे समजून आले आहे. त्याने त्याचा शालक मनोज सूर्यवंशी हा स्टेट बँक ऑफ
इंडीया कालीका माता जळगाव येथे ऑफिस बॉय म्हणून करार पध्दतीने नोकरीस असल्याने त्याचे सोबत संगणमत करून शंकर रमेश जासक, त्याचे वडील रमेश राजाराम जासक व शालक मनोज रमेश सुर्यवंशी अश्यांनी केला असून त्याने बँकेतून नेलेले (गेलामाल ६०१५.८४ ग्रॅम वजानाचे ३,६०,००,०००/- रु. किं.चे सोने व १७,१०,३७०/- रु. रोख कॅश) पैकी आरोपी शंकर रमेश जासक याने त्याचे घरातून (मिळाला माल ६०१५.८४ ग्रॅम वजानाचे ३,६०,००,०००/- रु. किं. चे सोने व १६,४०,३७०/- रु. रोख कॅश) हि काढून दिली असून ती सदर गुन्हयाकामी ताब्यात घेतली आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री संदिप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग यांचे मार्गदर्शना खाली श्री शंकर शेळके, पोलीस निरीक्षक, शनिपेठ पो.स्टे. हे करीत आहेत.