यावल (सुरेश पाटील)
रा.प.महामंडळ जळगाव विभागात यावल आगारातर्फे यावल बस स्टॅन्ड आवारात आज शनिवार दि.3 जून 2023 रोजी एस.टी.च्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.यावल आगारात रांगोळी प्रवाशांसोबत एसटी बसचे पूजन करून श्रीफळ फोडून प्रवाशांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला.[ads id="ads1"]
आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी यावल आगारातून सुटणाऱ्या एसटी बस मधील प्रवाशी बांधवांना शुभेच्छा दिल्या. बसस्थानकात रांगोळी काढून,तोरण बांधून,फुलहार लावण्यात आले. महिला/ पुरुष प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी प्रवाशांचे मनपूर्वक स्वागत केले.[ads id="ads2"]
यावेळी आगारातील पर्यवेक्षकीय यांत्रिक कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी, व प्रवाशी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यशाळा सहाय्यक अधिक्षक विजय पाटील, वाहतूक निरीक्षक वानखेडे , आगार लेखाकार बारसे , चालक डिगंबर सोनवणे,दीपक गुरव इतर कर्मचारी हजर होते.