भुसावळ (फिरोज तडवी)
भुसावळ येथे आर्या फौंडेशन संचलित नवजीवन हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र , सक्षम काँसलिंग सेंटर ,सक्षम नारी फाउंडेशन, कस्ट्राईब शिक्षक महासंघ शाखा भुसावळ यांच्यावतीने जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा आयोजन करून संपन्न करण्यात आला.[ads id="ads1"]
प्रकल्प प्रमुख म्हणून समाधान जाधव यांनी विविध स्पर्धांचे नियोजन केले.31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस चित्रकला,निबंध, कविता स्पर्धेचे पारितोषिक वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष श्री चंद्रकांत चौधरी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सचिव यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र आर्या फाउंडेशन ,भुसावळ. प्रमुख डॉ. वंदना वाकचौरे यांनी केले. नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र व्यसनी पेशंटचे चांगले व कटू अनुभव त्यांनी उपस्थितां समोर व्यक्त केले.व समाजातील मुख्यता युवावर्ग व्यसनाधीन होत आहे त्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन पावले उचलणे गरजेचे आहे,असे सांगितले.[ads id="ads2"]
सक्षम कौन्सिलींगच्या आरती चौधरी, यांनी व्यसन का लागतात व त्यावर कशी मात करता येईल हे सांगीतले. व व्यसनांमुळे संसार मोडले जातात त्यामुळे व्यसनमुक्ती खूप महत्वाची आहे.
डॉ सुवर्णा गाढेकर यांनी उपस्थितांना व्यसनाचे प्रकार, तंबाखू पासून होणारे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम , यामुळे समाज मनामध्ये आलेले नैराश्य या बाबत प्रबोधन केले. . *कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत चौधरी यांनी कविता लेखन चित्रकला निबंध लेखन विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित केले. नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र करीत असलेले व्यसनमुक्तीचे प्रबोधनात्मक कार्याची स्तुती केली. या कार्याची पावती म्हणून शासनाच्या वतीने नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राला शासन मान्यता मिळाली याबाबत अभिनंदन केले. व्यसनमुक्ती केंद्राला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व्यसनमुक्ती केंद्राचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान सन्माननीय पिताश्री अरुण तायडे, श्री युवराज कुरकुरे सर ,हिरकणी महिला ग्रुपच्या आशा पाटील ,विनायक वाघ,व्यसनमुक्ती प्रबोधनावर आधारित चित्रकला कविता निबंध स्पर्धेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला. चित्रकला स्पर्धेत प्रथम खुशी सचिन हरीमकर , द्वितीय नारायनी विसपुते , तृतीय देवयानी पाटील. निबंध स्पर्धेत श्रीमती वर्षा अहिरराव , द्वितीय विनायक वाघ, तृतीय. कुमारी अनघा विक्रम पाटील. कविता लेखन प्रथम प्रताप इंगळे, द्वितीय रोशन निकम, तृतीय शितल बाविस्कर हे सर्व विजयी स्पर्धक ठरले. स्पर्धांचे परीक्षक म्हणून संध्या भोळे ,ललित भोळे अमित पाटील यांनी परीक्षक म्हणून उत्कृष्ट परीक्षण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्य श्रीमती रजनीताई बडगुजर यांनी केले व आभार समाधान जाधव सर यांनी केले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यसनमुक्ती वर आधारित या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.