जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) प्रहार दिव्यांग संघटना संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग मंत्रालय कॅबिनेट मंत्री माननीय बच्चु भाऊ यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत तसेच प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांनी प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा सल्लागार माननीय राजमल दादा वाघ यांच्याशी चर्चा करून दिनांक 4 /6 /2023 रोजी रावेर तालुक्यातील निंबोल गावतिल प्रहार दिव्यांग क्रांती संघटना चे तालुकाध्यक्ष श्री विनोद हरी कोळी यांचे प्रगती पथकावरचे कार्य लक्षात घेता त्यांचे नुकतीच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.[ads id="ads1"]
राजेश सोमा खडके यांची जळगाव महानगर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच निळकंठ देवराम साबणे यांची जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली . या सर्वांना नियुक्तीपत्र प्रहार दिव्यांग क्रांती संघटना चे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तसेच पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.