चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहा हजाराची लाच घेतांना भुसावल पोलीस एसीबीच्या जाळ्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) शेतातील इलेक्ट्रिक मोटार पंप प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी रुपये सहा हजाराची लाच घेताना भुसावल तालुका पोलिस स्टेशनचा (Bhusawal Taluka Police Station) हवालदार गणेश पोपटराव गव्हाणे (रा. जामनेर) यास जळगाव एसीबी (Jalgaon ACB) पथकाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली.[ads id="ads1"]

भुसावल तालुक्यातील कुऱ्हे पानांचे (Kurhe Panac he)परिसरातील ३५ वर्षीय शेतकरी सह अन्य दोन शेतकऱ्यांच्या शेतातील रुपये पाच हजार किमतीची इलेक्ट्रिक मोटार चोरीला गेल्याने त्यांनी भुसावल तालुका पोलिस स्टेशनला माहिती कळविली होती ,कुऱ्हे बिटचे हवालदार गणेश गव्हाणे यांनी तोंडी तक्रारीवरून संशय असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधून समबंधीत शेतकऱ्यांचा तुमच्यावर चोरीचा आरोप असून प्रकरण मिटविण्यासाठी मोटार चोरीपोटी पाच हजार व मला एक हजार देण्याची मागणी केली.[ads id="ads2"]

 परंतु तक्रारदाराने एसीबी कडे काल बुधवारी तक्रार केल्याने आज गुरुवार २२ जून रोजी सकाळी ९.३० वाजता भुसावल जवळील मंडवेदिगर फाट्या जवळ लाच घेताना अटक केली . सदरची कारवाई एसीबीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शना खाली पोलिसनिरीक्षक संजोग बच्छाव व सहकाऱ्यांनी केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!