भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : कुऱ्हे (पानाचे) ता. भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर बडगुजर यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या भटके विमुक्त जाती जमाती विभागाच्या प्रदेश महासचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. टिळक भवन दादर मुंबई येथील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व भटके विमुक्त विभागाच्या प्रदेशाध्यक्ष एडवोकेट पल्लवी ताई रेणके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. [ads id="ads1"]
यावेळी मंचावर सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष बादल गायकवाड व्ही. जे. एन.टी. विभागाचे माजी अध्यक्ष मदन जाधव, ज्येष्ठ नेते रमेश अण्णा श्रीखंडे, बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश गायकवाड, सेवानिवृत्त एसीपी फुलचंद पवार आदी नेते उपस्थित होते. सुधाकर बडगुजर हे गेल्या 30 वर्षांपासून समाजातील भटक्या, विमुक्त वंचित समाज घटकांच्या उन्नतीसाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहे. राज्यस्तरावरील अनेक शिव ,फुले ,शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारधारेच्या पुरोगामी संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.[ads id="ads2"]
सध्या ते सत्यशोधक समाज संघाचे उपाध्यक्ष असून छात्र युवा संघर्ष वाहिनी या राष्ट्रीय स्तरावरील युवकांच्या संघटनेत सुद्धा त्यांनी राज्य संयोजक म्हणून अनेक वर्षे कार्य केले आहे. तसेच भटके विमुक्तांच्या प्रश्नांवर संघर्षात्मक तसेच रचनात्मक स्तरावर त्यांनी कार्य केले आहे. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरांवर ज्यांचे खूप मोठे योगदान आहे असे अण्णासाहेब बाळकृष्ण रेणके हे राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष असताना सुद्धा सुधाकर बडगुजर यांनी आयोगाला सहकार्य केले आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार मल्लिकार्जुन खरगे, नेत्या मा खासदार श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांचा दृष्टिकोन आणि पक्षाची उद्दिष्टे भटक्या समाजातल्या तळागाळापर्यंत नेऊन पक्षासाठी पूर्णवेळ वाहून घेणार असल्याचे यावेळी सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विविध पुरोगामी सामाजिक चळवळींच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड लोकसंग्रह सुधाकर बडगुजर यांच्याकडे आहे. ही त्यांच्या सामाजिक कार्याची जमेची बाजू आहे. एक अभ्यासू पारदर्शक आणि तळमळीने कार्य करणारे नेतृत्व अशी जनमानसात त्यांची प्रतिमा आहे. या निवडीबद्दल मधुकर सपकाळे, राजू जाधव, आनंद सपकाळे, डाॅ.समाधान बारी, रामलाल बडगुजर, हारून मन्सूरी, उपसरपंच बरकले, समाधान बडगुजर, गणेश शेळके, संजय कोळी, डॉ. उमेश पाटील, आबा पाटील, सावकार पारधी, कृ.बा समिती सदस्य किशोर कोळी, आई प्रतिष्ठानचे अरविंद बावस्कर,ज्येष्ठ नागरिक संघाचे कळस्कर सर, प्रमोद उंबरकर ,जी .के. पाटील, माजी सरपंच रवींद्र वराडे, मोहन ताडे, गोपाल आस्वार, रामदास बडगुजर, नाना भाऊ पवार,मा. उपसरपंच विलास रंदाळे, शशिकांत वराडे, बाळू बारी, छगन पाटील, अतुल पाटील , संजय वराडे, लक्ष्मण जाधव, रमेश जाधव यांच्या वतीने सुधाकर बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला.