यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील चूंचाळे ग्रामपंचायत ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर या ग्रामपंचायत मध्ये मनमानी आणि सोयीनुसार कामकाज करीत असल्याने चुंचाळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्यासह सुमारे 200 ते 250 ग्रामस्थांनी आपली स्वाक्षरी करून यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती आणि आहे परंतु गट विकास अधिकारी यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने तसेच ग्रामसेविकेची बदली न केल्यामुळे यावल पंचायत समिती कार्यालयासमोर आज चुंचाळे ग्रामपंचायत महिला सरपंच सौ.नौशाद मुबारक तडवी यांनी आपल्या चार महिन्याच्या बाळासह तसेच उपसरपंच व सदस्य,ग्रामस्थ यांच्यासह उपोषण आंदोलन सुरू केले.[ads id="ads1"]
चुंचाळे ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर या ग्रामपंचायत कार्यालयीन वेळेत हजर राहत नाही.विकास कामे व ग्रामपंचायत मधील प्राथमिक सुविधा व ग्रामस्थांच्या अडीअडचणींच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करत असल्याने ग्रामस्थ यांच्या तक्रारीत वाढ झाली आणि त्यांचे निराकरण करणे अवघड झाले आहे,यामुळे ग्रामस्थ,सरपंच,ग्रा.पं.सदस्य यांच्यात वाद होत आहेत. [ads id="ads2"]
गावांमध्ये गटारी तुडुंब भरल्या आहेत वेळेवर साफसफाई होत नाही, सरपंच सदस्य यांनी सफाई कामगार यांना काम दिले असता ग्रामसेवक हे असे उत्तर देतात की या कामाची रक्कम सरपंच सदस्य तुम्ही गावात वसुली करून देऊन टाका नाहीतर तुम्ही स्वतः द्या असे सांगत असतात त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे,ग्रामसेवक हे गावात वसुली करण्यासाठी जात नाही त्यामुळे गावातुन पूर्ण प्रमाणात ग्रा.पं.कर वसुली झाली नाही यामुळे गावात कोणतेही विकास काम होत नाही,ग्रामपंचायत दप्तर ग्रामसेवक त्यांच्या घरी ठेवतात त्यामुळे ग्रामस्थांना वेळेवर दाखले,उतारे मिळत नाही त्यामुळे ग्रामसेवक प्रियंका अशोक बाविस्कर यांची बदली करून मिळावी अन्यथा सरपंच,उपसरपंच, सदस्य आपल्या पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसणार आहे असा इशारा दि.22 मे 2023 रोजी देण्यात आला होता तरीसुद्धा गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेची बदली न केल्यामुळे अखेर आज गुरुवार दि.22 जून पासून चुंचाळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ बेमुदत उपोषणास बसले आहेत त्यामुळे आता गट विकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.