धरणगांव अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड, चेअरमन श्री. प्रविण कुडे तर व्हा. चेअरमन श्री. अंजनीकुमार मुंदडा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



धरणगांव :- येथील दि अर्बन को ऑप. बँक लि. धरणगांव या बँकेच्या मा. चेअरमन व मा. व्हा. चेअरमन निवडणूकीचा कार्यक्रम मा. अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, धरणगांव श्री. विशाल ठाकुर सी. यांचे अध्यक्षतेखाली दि. २१.०६.२०२३ बुधवार रोजी सकाळी १०.३० वाजता बँकेच्या धरणगांव येथील मुख्यालयाच्या सभागृहात आयोजीत केला होता. नामनिर्देशन पत्र स्विकृतीच्या वेळे पावेतो चेअरमन पदासाठी श्री. प्रविण तुकाराम कुडे व व्हा.चेअरमन पदासाठी श्री. अंजनीकुमार भवरलाल मुंदडा यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने श्री. प्रविण तुकाराम कुडे यांची चेअरमन पदी व श्री. अंजनीकुमार भवरलाल मुंदडा यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे मा. अध्यासी अधिकारी यांनी जाहिर केले.

नवनियुक्त संचालक मंडळात सर्वसाधारण मतदार संघातुन श्री. सुभाष देवराम पाटील, श्री. प्रविण तुकाराम कुडे, श्री. रविंद्र नामदेव पाटील, श्री. अंजनीकुमार भवरलालजी मुंदडा, श्री. संजय ताराचंद कोठारी, अॅड. श्री. दत्तात्रय लोटू महाजन, श्री. सचिन अरविंद शहा, डॉ. श्री. स्वप्निल ज्ञानेश्वर पाटील, श्री. सचिन विनायक बागुल, श्री. नितीन रघुनाथ चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महिला राखीव मतदार संघातुन डॉ. सौ. मनिषा शैलेशसिंग सुर्यवंशी व डॉ. सौ. अर्चना शाम काबरा, ओबीसी मतदार संघातुन डॉ. श्री. पुष्कर रमेश महाजन, अनुसुचित जाती / जमाती मधुन श्री. सचिन अर्जुन पानपाटील व विजाभज / विमाप्र मतदार संघातुन श्री. समाधान पुना धनगर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सदर निवडणूक प्रक्रियेसाठी मा. अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, धरणगांव श्री. विशाल ठाकुर सी व त्यांचे सहकारी श्री. हेमंत पाटील, श्री. शिंदे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. बँकेचे माजी चेअरमन श्री. हेमलालशेठ भाटीया यांच्या मार्गदर्शनाने बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे व संचालकांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!