रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर (Burhanpur -Ankleshwar High Way) महामार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील 40 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दिनांक २१ जून बुधवारी घडला.[ads id="ads1"]
शेख शरीफ हे त्यांच्या पत्नी मरीयमबी शेख शरीफ (वय 40, रा.खिरोदा प्र.यावल) यांच्यासह दुचाकी ने बऱ्हाणपूरकडे जात असताना रावेर जवळील पंजाबशहा बाबा दर्गा जवळ(Punjab Shaha Baba Darga) पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो (UP12 BF 5844) ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील मरीयम शेख यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. [ads id="ads2"]
याबाबत रावेर पोलिस स्थानकात (Raver Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अपघाताची माहिती कळताच रावेर मुस्लिम पंच कमेटी सदस्य गयास शेख गयासुद्दीन काझी, अब्दुल रफिक शेख सादिक मेंबर यांनी रावेर येथील ग्रामीण रुग्णालय (Raver Rural Hospital) गाठत मदत केली.


