याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सचिन कैलास चव्हाण, सोन्या उर्फ तुषार जाधव, सनी जाधव उर्फ फौजी व कुंदन पाटील असे संशयित आरोपींचे नाव असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads2"]
काय आहे घटना?
हॉटेल जान्हवीजवळ तसेच रामेश्वर कॉलनीत रविवार, 11 रोजी घडली. या प्रकरणी चौघांविरोधात मंगळवारी रात्री उशिरा जळगाव एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या घटनेत चेतन प्रकाश चौधरी (23, रामेश्वर कॉलनी, जळगाव) या युवकाचा मृत्यू झाला आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, रविवारी दुपारी चार वाजता चेतनला गल्लीतील चार तरुणांनी जुन्या वादातून चेतनला बेदम मारहाण केल्याने तो गल्लीत पडल्याची माहिती त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी धाव घेत मुलाला जिल्हा रुग्णालयात हलवले मात्र रात्री साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी प्रकाश रघुनाथ चौधरी,(प्रियंका किराणा शेजारी, रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी जळगाव एमआयडीसी पोलिसात मंगळवारी रात्री तक्रार दिल्यानंतर संशयित सचिन कैलास चव्हाण, सोन्या उर्फ तुषार जाधव, सनी जाधव उर्फ फौजी व कुंदन पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


