वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने रावेर तहसीलदार यांना विविध मागण्याचे निवेदन सादर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर  ( सुवर्ण दिप वृत्तसेवा)  रावेर वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील बोंडार या गावातील अक्षय भालेराव नावाच्या भिमसैनिकाची क्रूरपणे हत्या करण्यात आली. कारण असे आहे की अक्षय भालेराव या भीमसैनिकांनी त्याच्या गावात भीम जयंती साजरी केली या कारणाने बोंढार या गावातील काही जातीवादी मानसिकतेच्या गावगुंडांनी तीष्ण हत्याराने त्याचा खून करून जीवे ठार मारण्यात आले आहे.[ads id="ads1"]

  ही घटना अत्यंत निंदनीय आहे लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. फुले, शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रात आंबेडकरी तरुणाला जीवे ठार मारणाऱ्या गावगुंडांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या खून प्रकरणातील अजून काही आरोपी फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करावी. आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा. व मयत अक्षय भालेराव याच्या परिवाराला पोलीस बंदोबस्त देऊन त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच त्यांच्या कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा. असे निवेदनात म्हटले आहे निवेदन मा. रावेर तहसीलदार बंडू कापसे यांना देण्यात आले.[ads id="ads2"]

सदर या घटनेचा वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने जाहीर असा तीव्र निषेध करण्यात येत आहे. तसेच अक्षय भालेराव या तरुणाच्या कुटुंबीय यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष व आंबेडकरी समाज मोठ्या  ताकदीने उभा आहे याची शासनाने नोंद घ्यावी. असे निवेदनाद्वारे कळविण्यात येत आहे.

खालील मागण्या

1) केंद्र सरकार असो वा राज्य सरकार एससी ,एसटी ,ओबीसी या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे                 

 2) संजय गांधी श्रावण बाळ इंदिरा गांधी वृद्धपकाळ या योजनेसाठी तहसीलदार यांचे उत्पन्नाचे दाखल्यांची जाचकट रद्द करून त्याला त्यांच्या स्थानिक चौकशी वरून आहे  हयातीचे दाखले व स्वयंघोषणापत्र गृहीत धरून स्थानिक गावचे तलाठ्याकडे जमा करण्याचे आदेश करण्यात यावे.          

3) रावेर शहरातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजना 2019 चा शेवटचा हप्ता त्वरित देण्यात यावा.                             

4) संजय गांधी ,कार्यालयातील संजय गांधी, वृद्ध काळ ,श्रावणबाळ, इंदिरा गांधी या योजनेची रक्कम दर महिन्याला देण्यात यावी जेणेकरून वृद्ध  व्यक्तींची धावपळ होऊ नये.

    5) वारकरी संप्रदाय लोकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.                            6) मुलांचे शैक्षणिक कामासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले ,जातीचे दाखले, अधिवास दाखले ,नॉन क्रिमिलियर दाखले हे त्वरित मिळावे.

        7)दि.8/6/2023 रोजी रावेर तालुक्यात वादळी वारा व पावसासह घरे व शेती केळी पिकाचे जास्त प्रमाणात झालेल्या नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळावी.                                

निवेदनावर खालील  लोकांच्या सह्या होत्या.

वंचित बहुजन आघाडी  रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे तालुका उपाध्यक्ष सलीम शहा यासीन शहा, तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, तालुका संघटक कंदर सिंग बारेला, रतन भालेराव ,किरण पोहेकर ,अजय तायडे, दौलत अडांगळे ,नितीन तायडे ,शेख इमरान शेख रमजान ,संदीप हिवरे ,योगेश निकम ,श्रावण पाटील ,कैलास धनगर ,सुनील सोनार ,किशोर सूरदास , युवराज तायडे ,प्रदीप खैरे, प्रवीण निकम ,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!