केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव शाळेत जी २० कार्यक्रमांतर्गत लोकसहभाग मोहिमेत विविध उपक्रम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव शाळेत जी २० कार्यक्रमांतर्गत लोकसहभाग मोहिमेत विविध उपक्रम

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  : येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मधील केंद्रीय विद्यालयांमध्ये जी २० अंतर्गत लोक सहभाग मोहिमेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. १ जून ते १५ जून पर्यंत विविध उपक्रम शाळेचे प्राचार्य श्री. मैथ्यू अब्राहम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. तसेच केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव आणि प्राचार्य हे जिल्ह्यातील सर्व सीबीएसई शाळेचे मुख्य आयोजक होते. [ads id="ads1"]

  या उपक्रमांमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांनी सहभाग घेऊन तो यशस्वी आणि अविस्मरणीय केला. सायकल रॅली, प्रभात फेरी, ऑनलाइन सभा, प्रख्यात व्यक्तींची भाषणे, एफ एल एन क्रियाकलाप, चित्रकला स्पर्धा, कार्यशाळा, रांगोळी स्पर्धा, दृकश्राव्य साधने बनविणे, कटपुतली बनवणे, कथाकथन, कथा लेखन, कला आणि हस्तकला, चित्रपट दाखविणे इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. [ads id="ads2"]

  या उपक्रमांमध्ये अनेकांनी सहभाग घेतला. लोकसहभाग कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम जी २० आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वर केंद्रित होते. शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्याचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा, घोषवाक्य लेखन, कविता लेखन, निबंध लेखन इत्यादींमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. 

  विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशील शैलीत दिलेल्या विषयावर पावर पॉइंट प्रेझेंटेशन, स्क्रॅप बुक, अल्बम, कोलाज आणि पोस्टर बनविली. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका यात सुमित रंगारी, शैलजा मीना, मीनाक्षी राजेश पाटील, मीनाक्षी माधवराव पाटील, विद्या हिवराळे, सोनाली काकुस्ते, विनोद राठोड, प्रीती सोज्वळ, प्राची पाटील, एकनाथ सातव, दिनेश पाटील, मिथुन ढिवरे, मीनाक्षी माळी, धर्मेंद्र सिंह, दर्शन पाटील, पुनम खरात, संतोषकुमार बुनकर, संतोष दादा पाटील, गणेश अहिरवार, नितीन आरसे यांचे मोलाचे योगदान होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!