रावेर शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर : सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांवर तत्काळ होणार कारवाई : एम. राजकुमार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा)  : पोलीस दप्तरी संवेदनशील असलेल्या रावेर शहरात आता १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर तातडीने आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर कारवाई करता येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी येथे केले. रावेर पोलीस ठाण्यात जातीय सलोखा व शांतता समितीची बैठक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा व विश्रामगृह उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. [ads id="ads1"]

यांची व्यासपीठावर उपस्थिती

यावेळी प्रसंगी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, आयएएस अर्पित चव्हाण, अधिकारी उपविभागीय पोलीस कुणाल सोनवणे, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार बंडू कापसे, परीविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, मुख्याधिकारी स्वालिया मालगावे, धनंजय चौधरी, दारा मोहम्मद उपस्थित होते.[ads id="ads2"]

यावेळी पद्माकर महाजन, प्रल्हाद महाजन, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, बाजार समिती उपसभापती योगेश पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख दिलीप पाटील, अनिल अग्रवाल, योगेश गजरे, कन्हैया अग्रवाल, सादीक शेख, अॅड. प्रवीण पाचपोहे, सोपान पाटील, ई. जे. महाजन, मुन्ना अग्रवाल, सुधाकर नाईक, डॉ. सुरेश पाटील, संतोष पाटील, अशोक शिंदे, दिलीप कांबळे, पाटील, अशोक वाणी, उमेश महाजन, यूसुफ खान, गयास शेख, गयासुद्दीन काझी यांच्यासह आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले.

हेही वाचा: शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी ७५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक ताब्यात : जळगाव जिल्ह्यातील घटना

■ रावेर शहरात सुमारे १७ लाख २५ हजार खर्च करून १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या निमित्ताने संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत आले आहे त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना तसेच गुन्ह्यांना आळा बसणार असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!