जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
जळगाव येथील यशवंत भवन मध्ये नुकतीच महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष भिकाजी कांबळे मुंबई, राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे मुंबई, विभागीय सचिव डॉ. अनिल वानखडे खामगाव आणि के वाय सुरवाडे मुक्ताईनगर या समितीने जिल्हा शाखा जळगाव पूर्वची नूतन कार्यकारणी जाहीर केली. [ads id="ads1"]
या कार्यकारणी मध्ये अध्यक्ष म्हणून रविंद्र वानखेडे, सरचिटणीस म्हणून आनंद ढिवरे तर कोषाध्यक्ष म्हणून शैलेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच संस्कार उपाध्यक्ष सुशीलकुमार हिवाळे, महिला विभाग उपाध्यक्ष प्रियंका अहिरे, पर्यटन व प्रसार उपाध्यक्ष वसंत लोखंडे, समता सैनिक दल उपाध्यक्ष रमेश सावळे या प्रमुख पदांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर हिशोब तपासणी सुमंगल अहिरे, कार्यालयीन सचिव सुभाष सपकाळे, संस्कार विभाग सचिव रतिलाल पवार, तुषार रंधे, महिला विभाग सचिव माधुरी भालेराव, करुणा नरवाडे, पर्यटन प्रसार सचिव प्रकाश सरदार, युवराज नरवाडे, संरक्षण विभाग सचिव सुरेश जोहरे, यांची तर संघटक म्हणून भीमराव पवार, विजय अवसर आणि शेवटी कार्यालय व्यवस्थापक म्हणून विलास तायडे यांची नियुक्ती करण्यात आली. [ads id="ads2"]
निवड झालेल्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि अभिनंदन भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व सभासद आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन शैलेंद्र जाधव यांनी केले.


