"सिमरन वानखेडे" च्या त्या भाषणाची आठवण सांगत पवार साहेबांनी केले सर्वांना अवाक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

"सिमरन वानखेडे" च्या त्या भाषणाची आठवण सांगत पवार साहेबांनी केले सर्वांना अवाक


"५० वर्षापुर्वी सावदा नगरीचे नगराध्यक्ष विष्णू हरी पाटील त्यांचे माझे पारिवारिक संबंध होते. - खा.शरद पवार"

सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- खा.शरद पवार हे तीन दिवसापूर्वी जळगाव दौ-यावर आले असता जैन हिल्स येथे रावेर तालुक्यातील सावदा येथील सिमरण राजेश वानखेडे या तरुणीने खा.शरद पवार यांची भेट घेतली व स्वतःच्या परिचय दिला असता तू ७ वर्षांपूर्वी रावेर येथे  भाषण केले होते.असे त्यावेळी खा.शरद पवार यांनी सांगतच उपस्थित सर्वच नेते व पदाधिकारी हे साहेबांकडून पाहून आवक झाले.यात विशेष अशी की,या वयात देखील साहेब सर्व गोष्टींची आठवण ठेवतात हे मात्र खरे आहे.[ads id="ads1"]

पवार साहेब जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.म्हणून आपण त्यांना भेटायला जावू,असा आग्रह वडील राजेश भाऊ वानखेडे यांच्याकडे सिमरण वानखडे यांनी धरला असता,जैन हिल्स येथे सिमरन ही वडील व तिचे दोघे भावांसह शरद पवारांना भेटली असता,राजकारणातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व अशी छाप ठेवणारे वडील राजेश भाऊ वानखेडे यांच्या रंगात रंगलेली सिमरण वानखडे यांनी साहेबांना आपला परिचय(मछली के बच्चो को तैरना सिखाया नाही जाता)या म्हणीनुसार देत असताना,पवार साहेबांनी त्याच्याही पुढे सांगीतले की,सिमरण आता तू काय करित आहे?तीने सांगितले की मी मुंबईत(बी.बी.ए.)करित असून,तू पुढे काय करणार?असे विचारल्यावर गेल्या ७ वर्षापूर्वी जेव्हा रावेर येथे माझी जाहीर सभा होती तेव्हा तूने केलेले भाषण व ते मुद्दे आजही मला आठवतात असे म्हणतच उपस्थित सर्वांच्या नजरा साहेबांच्या बोलण्याकडे गेल्या,सिमरण तू ज्या सावदा ऐतिहासिक नगरीतून आली.[ads id="ads2"]

   त्या नगरीचे आजच्या ५० वर्षापूर्वी विष्णू हरी पाटील हे नगराध्यक्ष होते,त्यांचे माझे पारिवारिक संबंध होते,असे सांगून वेगवेगळा राजकीय दाखला शरद पवार साहेबांनी दिला.तरी अशा सावदा नगरीचे नेतृत्व करण्याची संधी तुझे वडील राजेश वानखेडे यांना लाभली आहे.ही उल्लेखनीय बाब असल्याचे देखील खा.शरद पवार यांनी सांगितले.यावेळी माजी.नगरसेवक अमर जैन,माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे व राजेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!