नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव येथील वंचित बहुजन आघाडीच्या पूर्वी असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे इमानदारीने काम केले नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षाला मरगळ आली होती. हे लक्षात आल्यानंतर वरिष्ठांनी वंचित बहुजन आघाडीच्या नांदगाव तालुका अध्यक्षपदी धडाडीचे मनापासून काम करणारे बाळासाहेब बोरकर यांची निवड करण्यात आली. यानंतर बाळासाहेब बोरकर यांनी पक्षाच्या बांधणी संदर्भात मोठे पाऊल उचलले असून वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध गोरगरिबांची कामे करून देण्याचे बाळासाहेब बोरकर यांनी पावले उचलली आहेत.[ads id="ads1"]
काही नांदगाव शहर व तालुक्याचे कार्यकर्ते पुढारी हे वंचित बहुजन आघाडी मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना फोडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्या अनुषंगाने दिनांक 5 मे 2023 रोजी सोमवारी नांदगाव येथील रेस्ट हाऊस मध्ये सर्व खेड्यापाड्यातील उत्सुक असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक घेतली. ज्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडी पक्षाचे मनापासून काम करायचे नसेल तर त्यांनी पक्ष सोडला तरी चालेल. खरे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनीच काम करावे असे सुतवाच केले.[ads id="ads2"]
नांदगाव येथील रेस्ट हाऊस मध्ये वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने गट व गण विभाग प्रमुख व शाखा उभारणी यासाठी मीटिंग घेण्यात आली. व सर्वांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर, प्रकाश दिवार, योगेश गायकवाड, लक्ष्मीबाई गायकवाड, समाधान श्रीराम, लहुजी व्हरगळ, उत्तम भाऊ व खेड्यातील कार्यकर्ते झोप पदाधिकारी व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


