भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतर एकनाथराव खडसे यांना आमदारकी मिळाली असून ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी अलीकडेच नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यानंतर थेट विनोद तावडे यांनीच खडसे यांना साद घातली होती.[ads id="ads2"]
माझ्यासह अन्य नेत्यांनी भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न केलेच. मात्र २०१४ नंतर माझा खूप छळ करण्यात आला. राष्ट्रवादीने मला नव्याने उभारी देत आमदारकी दिली असून आता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे खडसे म्हणाले.विनोद तावडे यांचे भारतीय जनता पक्षामध्ये मोठे योगदान आहे. पक्ष विस्तारासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले आहेत.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
सध्या राजकीय परिस्थिती बघता त्यांनी जुन्या नेत्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात यावं असं आवाहन केलं असेल. मात्र मी स्वतः कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही. तिथे माझा छळ झाला आहे. असे एकनाथराव खडसे पत्रकारांशी बोलताना जळगाव येथे म्हणाले.