फैजपूर येथील आदिवासी हक्क परिषद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण रावेर तालुका पदाधिकारी प्रचार आणि प्रसार लागले जोमाने कामाला

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर( सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर  तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने येत्या 9  जून रोजी फैजपूर येथे आदिवासी हक्क परिषद होत असून आदिवासी समुदायाला जागृत करण्या सह त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर हे शुक्रवारी दिनांक 9 जून रोजी दुपारी 4  वाजता फैजपूर येथे येत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी हक्क परिषद होत आहे. 

  त्याची जोरदार तयारी सुरू असून रावेर येथे आदिवासी तांड्यावर  सायंकाळी 6 वाजता वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, तालुका उपाध्यक्ष सलीम शहा शहर उपाध्यक्ष दौलत अडांगळे, कंदर सिंग बारेला तालुका पदाधिकारी आदिवासी लोकांना समजावून सांगत असताना दिसत आहे.

यावेळी संत्राबाई बारेला, गुणाबाई बारेला ,रेतलीबाई बारेला , बावलिया बारेला ,रवीना बारेला, भुरा बाईला, चंदाबाई बारेला ,सीमा बारेला, शेवंतीबाई बारेला ,प्रमिला बारीला, सुरेश बारेला ,चंद्रसिंग बारेला, भिमसिंग बारेला ,शिवलाल बारेला, विकास बारेला इत्यादी आदिवासी महिला पुरुष या ठिकाणी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!