कुलरला स्पर्श करताच बसला जबर झटका
यावल तालुक्यातील डांभूर्णी (Dambhurni Taluka Yawal Dist Jalgaon) येथील निकेश दिनकर नेहेते हा घरगुती इलेक्ट्रिकचे काम करीत असताना दुरुस्त केलेले कुलर पुन्हा शॉक मारत असल्याने सोमवारी सकाळी बाळू कोळी यांनी निकेश नेहेते यास घरी बोलावले असता कुठलीही सुरक्षेची साधने न बाळगता कुलरला स्पर्श करताच जोरदार झटका बसल्याने निकेश हा जमिनीवर कोसळून पडला.[ads id="ads2"]
घरातील लोकांनी विद्युत पुरवठा खंडित करून निकेश नेहेते यास उपचारासाठी जळगाव (Jalgaon) येथील रुग्णालयात (Hospital) हलवले मात्र रस्त्यातच त्याची प्राणजोत मालवली.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील चिनावल येथील 46 वर्षीय इसमाची मुक्ताईनगर मध्ये दगडाने ठेचून हत्या ; परिसरात खळबळ
हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" गावातील ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता : रावेर पोलीसांत हरवल्याची नोंद
यावल ग्रामीण रुग्णालयात (Yawal Rural Hospital)मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. अविवाहित निकेशच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परीवार आहे.त्यांच्या निधनावर डांभूर्णी (Dambhurni Taluka Yawal) गावावर शोककळा पसरली.