यावल तहसीलदारपदाचा चार्ज घेण्याआधीच अवैध गौण खनिज वाहतूकदारांना नवनियुक्त तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांचा दणका

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील)

यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आज सोमवार दि.5 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता सकाळी भुसावळहुन यावल येथील यावल तहसील कार्यालयात आपल्या तहसील पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी येत असताना अंजाळे गावाजवळ अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर पकडल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये तसेच संपूर्ण महसूल यंत्रणे मध्ये मोठी खळबळ उडाली. 

  प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना त्या म्हणाल्या की भर दिवसा अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याचे कारवाई करण्यात आली यापुढे सुद्धा अवैध गौण खनिज व अवैध व चुकीची कामे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे यावल तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारताना तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!