यावल (सुरेश पाटील)
यावल शहरासह तालुक्यात आज दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने मात्र यावल शहरात यावल नगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे पितळ उघडे पडले.[ads id="ads1"]
यावल शहरात गंगानगर मध्ये महादेव मंदिरात विकास कामे ठेकेदाराने मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे न केल्यामुळे तसेच मंदिर परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था न केल्यामुळे आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले.[ads id="ads2"]
तसेच नगरपालिका कार्यक्षेत्रात विकसित भागात वीज वितरण कंपनी मार्फत पावसाळ्यापूर्वी ट्री कटिंग न केल्यामुळे अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक तारा तुटल्या त्यामुळे यावल शहरात ठीक ठिकाणी सहा ते सात तास वीज पुरवठा खंडित झाला. संबंधित सर्व शासकीय यंत्रणेमार्फत पावसाळ्यापूर्वी नदी,नाले,शहरातील व ग्रामीण भागातील गटारीची साफसफाई व इतर अनेक कामे न केल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.