सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा स्थानिक स्वराज्य संस्थे मार्फत पावसाळ्या पुर्वी शहरातील गटारी व नाल्यांची साफसफाई झाली नसली,तरी आज दि.४ जुन रोजी सकाळी ११-४० वाजेच्या दरम्यान सावदा व परिसरात जोदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गार पडल्यामुळे नैसर्गिक रित्या शहरातील गटारी व नाले तुडुंब वाहुन निघाल्याने त्यांची साफसफाई झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.[ads id="ads1"]
नैसर्गिक रित्या वातावरणात बदल झाल्याने अतिशय जाणवत असलेली उष्णतेपासून सध्या तरी लोकांना राहत मिळाल्याचे दिसून येते.यासोबत गावात ख्वाजा नगर गेट व सावदा-फैजपूर रस्त्यावर पाताळ गंगा नाल्याच्या पुला जवळ जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला होता.यामुळे विज वितरणाचे विज पोल सह विज वाहिन्या तुटून पडल्याने संपूर्ण शहराचा विजपुरवठा खंडित झाला असून,विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे कार्य विज वितरण तर्फे सुरू आहे.[ads id="ads2"]
तसेच मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे सावदा येथे भरलेल्या रविवारच्या बाजारावर देखील याचे विपरीत परिणाम झाले.तसेच गावात मोठा मठ परिसरात वामन नरसु चौधरी याच्या घराची भिंत देखील पडल्याची घटना घडली आहे. एकत्रित रित्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गार पडल्यामुळे शेती आणि केळी बागांचे देखील नुकसान झाल्याचा अंदाज सुद्धा व्यक्त केला जात आहे.