नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव आगराच्या बस स्थानकामध्ये दिनांक 24 जून 2023 रोजी शनिवारी सायंकाळी उभ्या बसणे अचानक पेट घेतला. या लागलेल्या आगीत एसटी बस संपूर्णपणे जळून खाक झाली. परंतु जीवित हानी झाली नाही. वायरिंगच्या शॉर्ट सर्किट मुळे सदरची बस पेटली असा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात आला.[ads id="ads1"]
सदर बस नुकतीच कलर करून दुरुस्ती केली होती. दरम्यान. एसटी बसला आग लागल्याच्या प्रसंगी अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध न झाल्याने ही मोठी नुकसान नांदगाव आगराला सोसावे लागले. बस स्थानकातून प्रवासी सोडून लगेच डेपोत जाणार असल्याने बस स्थानकापासून या काही अंतरावर उभी केली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. दरम्यान सदर बस ही साडेसहा वाजता चाळीसगाव येथून नांदगाव येथे आली होती. या बसमधील सुमारे वीस प्रवासी नांदगाव बस स्थानकावर बस मधून खाली उतरल्यानंतर अवघ्या काही दहा मिनिटात बसत असल्याचे चालक डी ई थोरे आणि एस पी गीते यांच्या लक्षात आले. [ads id="ads2"]
सदर बस डेपो घेऊन जाण्यासाठी निघाले तेव्हा बस इंजिन जवळ वायरिंगचे शॉर्टसर्किट झाल्याने एसटी बसणे पेट घेतल्याचे चालकाला दिसले. यावेळी प्रचंड हवा असल्याने काही क्षणात बसण्याआधीचे रौद्ररूप धारण केले होते . या दरम्यान एसटी डेपोतून पाण्याचा टँकर बोलविला तो येईपर्यंत बस पूर्णपणे पेटली होती . एसटी डेपोचे कर्मचारी नागरिकांच्या मदतीने बस विझविण्यात आली. तोपर्यंत बसचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता. दरम्यान बस पेटली तेव्हा आगार प्रमुख हे वर्किंगला नांदगाव उड्डाण पुलावर होते तेव्हा त्यांना फोन गेला. तेव्हा त्यांनी तातडीने बस स्थानक गाठले. दरम्यान नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर गाढे दाखल झाले. यादरम्यान नांदगाव मनमाड पालिकेला अग्निशमनच्या बंबास पाचरण केले तेव्हा एक तासाने मनमाडचा अग्निशमन बंब दाखल झाला तेव्हा सर्व काही आज थंड झाली होती. मनमाडच्या बोंबाने पुन्हा पाणी मारले. बसला आग लागताच डेपोत असलेल्या इतर बस तात्काळ प्रवासी खाली करून त्या बाहेर नेण्यात आल्या. यावेळी सर्वांनी नांदगाव पालिकेच्या नव्या कोरे अग्निशामक बाबा ची आठवण झाली पण सदरचा बंब एका बंद घरात लावून ठेवण्यात आला आहे. तो फक्त नांदगाव ची शान आहे. असे बोल नागरिकांच्या तोंडून उमटले. यावेळी बस स्थानकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


