रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
आज दिनांक 25/ 6 /2023 या रोजी तालुक्यातील निंबोल ग्रामपंचायत मध्ये" शासन आपल्या दारी"या अभियानाची माहिती देण्यासाठी रावेर चे कर्तव्य दक्ष तहसीलदार बंडू कापसे यांनी हजेरी लावली.[ads id="ads1"]
"शासन आपल्या दारी"या या अभियानातील निंबोल गावातील लाभार्थी जसे की घरकुल लाभार्थी आणि इतर लाभार्थी यांना निंबोल येथील ग्रामसेवकामार्फत ग्रामपंचायत मध्ये बोलविण्यात आले. आणि त्या सर्व लाभार्थ्यांना या अभियानाची माहिती देण्यात आली.[ads id="ads2"]
तसेच रावेर चे तहसीलदार बंडू कापसे यांनी जळगाव येथे ज्यांनी घरकुलाचा आणि इतर विविध प्रकारचा लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांना दिनांक 27 जून २०२३ मंगळवार य रोजी पोलीस कवायत मैदान जळगाव येथे आमंत्रित केले आहे. त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थिती असणार आहेत.
त्यादिवशी निंबोल गावातून जळगाव जाण्यासाठी लाभार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सकाळी ठिक 10 वाजता असणार आहे. तसेच त्या ठिकाणी मोफत जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
त्या ठिकाणी" शासन आपल्या दारी "या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण असणार आहे. अशा प्रकारची माहिती देण्यासाठी निंबोल येथील ग्रामपंचायत उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथी, म्हणून तहसीलदार साहेब" बंडू कापसे", उपसरपंच अशोक पाटील ,विस्तार अधिकारी शिंदे साहेब ,ग्रामसेवक एमडी पाटील, मंडळ अधिकारी शेलकर अप्पा, तलाठी आप्पा, "प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा सचिव" विनोद कोळी, क्लार्क दिगंबर धनगर, क्लार्क विनोद अटकाळे, बाळू (भुरा) पाटील, अनिल पाटील, पंडित पाटील, गणेश भोई ,गंभीर कोळी, शंकर कोळी, सुरज तायडे, भगवान चिकटे .इत्यादी लाभार्थ्यांची त्या ठिकाणी उपस्थिती होती.


