नांदगाव :- प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील मौजे रोहिले बुद्रुक येथे जल जीवन मिशन योजनेतर्फ पाईपलाईन व पाण्याच्या टाकीचे काम मंजूर झाले असून पाण्याच्या टाकीवर टाकलेल्या स्लॅप वर पाणीच नाही. ठेकेदाराला याबाबत कल्पना देऊनही तसेच तक्रार देऊनही पाणी टाकले जात नसून हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार रोहिले बुद्रुक येथील नागरिकांनी केले आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील मौजे रोहिले बुद्रुक येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम व्यवस्थित झाली नसून. देखील संबंधित विभागाने या पाईपलाईनच्या कामाचे बिल काढल्याचे समजले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची टाकीचे बांधकाम सुरू असून या पाण्याच्या टाकी साठी करण्यात आलेले सिमेंटचे कॉलम यावर देखील व्यवस्थित पाणी मारले गेलेले नाही. त्यामुळे कॉलम पाणी अभावी निकृष्ट कमकुवत झाले असल्याची माहिती समोर आली असून या पाळी टाकीवर आठ दिवसापूर्वी स्लॅप टाकलेला आहे. परंतु संबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे पाण्याची कमतरता स्लॅप वर झाली आहे. [ads id="ads2"]
ग्रामपंचायत मार्फत पाण्याचे खड्डे भरले असून देखील ठेकेदार पिण्याच्या पाण्याच्या स्लॅप वर पाणी टाकत नाही. अशा तक्रारी येथील नागरिकांनी सरपंच ठकुबाई देविदास पवार, उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागुल यांच्याकडे केली असून. याबाबत ग्रामसेवक भगवान जाधव यांना देखील कल्पना दिली आहे. परंतु येथील काही राजकीय व्यक्तींनी पाणी गड्ड्यामध्ये भरताना फोटो ठेकेदाराला पाठवले आहेत. सदरचे फोटो हे चुकीचे असून यावर ठेकेदार भरोसा टाकत आहे. व सरपंच उपसरपंच यांच्यावर भरोसा टाकत नाही.
या अगोदर देखील या ग्रामपंचायतीने अंगणवाडी बांधकाम केले होते. या बांधकामावर देखील पाणी मारण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे या अंगणवाडीच्या इमारतीचा छताचा स्लॅप असल्यास रात्रीच्या वेळी खाली पडला होता. जर असल्या त्या ठिकाणी अंगणवाडी चे मुले व इतर कोणी दिवसा बसलेले असते तर जीव गेला असता. त्यामुळे या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत असल्यावर पाणी कमी मारले गेले तर हे काम कच्चे राहू शकते. त्यामुळे ठेकेदाराने जर लवकरात लवकर दखल घेतली नाही तर या टाकीवरील आम्ही ठेकेदारला पाडायला लावल्याशिवाय राहणार नाही. अशी माहिती येथील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी तक्रार आहे.