यावल येथील तहसिल कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे भीम आर्मीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की, न्हावी या गावात स्मशान भूमीसाठीची जागा आहे, या जागेवर गेल्या पंधरा वर्षांपासून अतिक्रमण झाले आहे. येथे झालेल्या अतिक्रमणामुळे मागासवर्गीय समाजातील बालकांचा किंवा अविवाहित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला त्याचे प्रेत दफन करण्यासाठी जागा उपलब्ध नसते आणि त्या ठिकाणी दफन करण्यासाठी गेले की वादाचा प्रसंग उभा राहतो. [ads id="ads2"]
म्हणून न्हावी येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची ही जागा व त्यावरील अतिक्रमण हे तातडीने काढून मिळावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन भिम आर्मीचे भूषण साळुंके, हेमराज तायडे, राहुल जयकर, भीमराव साळवे, मोसिम तडवी, पप्पू तडवी, अविनाश साळवे, सचिन मेढे यांच्या सह आदींच्या वतीने देण्यात आले.
• हेही वाचा : अचानक आलेल्या वादळामुळे 4 महिन्याची चिमुरडी झोक्यासहीत उडाली : रावेर शहरातील दुर्घटना
• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा
• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
• हेही वाचा: रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण