रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
निंबोल तालुका रावेर येथील शासकीय संपत्ती असलेले गायरान येथून भर दिवसा मातीची चोरी होत आहे. विशेष म्हणजे इतर दिवस वगळता रविवार या दिवशी मात्र भर दिवसा आणि रात्री मात्र विनापरवाना माती वाहणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी मात्र धुमाकूळ घातलेला आहे.[ads id="ads2"]
मात्र महसूल विभागाचे अद्याप कोणतीही कारवाई दिसून येत नाही तसेच तलाठी ,सर्कल यांचे मात्र उडवा उडवी चे उत्तर देऊन हात वरच त्यामुळे तलाठी सर्कल यांचे कोणतेही प्रकारचे दबाव तंत्र यांच्यावर नाही परस्पर तडजोड तर होत नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.